विज्ञान - लेखमाला

जुन्याचे सोने !


या वेळचे ऑलिंपिक

तोक्यो इथे २०२० साली होऊ न शकलेल्या olympic स्पर्धा या वर्षी होणार आहेत. या वर्षीच्या स्पर्धांची दोन वैशिष्ट्ये आहेत.

  • या स्पर्धा प्रेक्षकांविना होतील.
  • या वर्षी जी पदके देण्यात येणार आहेत, ती ही वेगळीच असतील.

पदकांचे वेगळेपण

या स्पर्धेत विजेत्यांना दिली जाणारी पदके पुनर्चक्रीकरण (recycle) केलेली असतील. इलेक्ट्रॉनिक वस्तू आजच्या जगात खूपच मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. या वस्तूंच्या निर्मितीत मौल्यवान धातू, अर्थात सोने आणि चांदी वापरली जाते. खराब झाल्या, जुन्या झाल्या की अशा वस्तू फेकून दिल्या जातात आणि कचऱ्याचे डोंगर वाढतच जातात. या वस्तूंमधील सोने, चांदी पुन्हा वेगळी करून त्यांचा उपयोग या स्पर्धेतील पदके बनवण्यासाठी केला गेला आहे.

जुन्याचे सोने

जपानमधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन, एप्रिल २०१७ ते मार्च २०१९ या कालावधीत अशा प्रकारचा electronic कचरा एकत्र केला. या कचऱ्यातून मौल्यवान धातू, सोने आणि चांदी, तसेच कांस्य वेगळे करून, त्यापासून बनवलेली पदके या वर्षीच्या विजेत्यांना प्रदान केली जातील. या उपक्रमात एका जर्मन कंपनीने आपले तंत्रज्ञान देऊन सहकार्य केले आहे. यासाठी सुमारे ८०००० टन कचऱ्यातून (त्यात ६२ लाख जुने मोबाईल फोन होते!) ५००० पदकांची निर्मिती करण्यात आली आहे.

या प्रक्रियेतून मिळवलेले धातूः

  • सोने सुमारे ३२ किलो
  • चांदी सुमारे ३५०० किलो
  • कांस्य सुमारे २२०० किलो

वरील माहितीसाठी संदर्भः

https://www.zeit.de/politik/2021-07/corona-studie-dunkelziffer-infektionen-nachrichtenpodcast

https://olympics.com/tokyo-2020/en/games/medals-project/

आपण काय शिकणार ?

सोन्याचे विलक्षण आकर्षण असणाऱ्या भारतीयांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधून (विशेषतः संगणकांमधील इलेक्ट्रॉनिक्समधून) सोने मिळवण्याचे तंत्रज्ञान आज भारतात नाही. पण प्लास्टिक कचऱ्याचे रूपांतर उपयुक्त रसायनांमधे करण्याचा प्रकल्प पुण्यात यशस्वी करून दाखवला आहे विज्ञान केंद्राचे हितचिंतक डॉ. जयंत गाडगीळ आणि उदय ओक यांनी. या उपक्रमाबद्दलचा लेख तुम्ही येथे वाचू शकाल.


तुमची प्रतिक्रिया तुम्ही इमेल ने पुढील पत्त्यावर पाठवू शकता:
editormail.png


मुख्यपान

Author: चित्ररेखा

Created: 2022-01-18 Tue 11:27