इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पांचे पुस्तक


इलेक्ट्रॉनिक्सचा छंद

काही महिन्यांपूर्वी विज्ञान केंद्राच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स हॉबी सेंटर चालू झाले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. सध्या ५ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे पाच प्रकल्पांचे पुस्तक लिहिले आहे. ते आज संकेतस्थळावर प्रकाशित करत आहे. ज्यांना विज्ञान केंद्रात येऊन प्रशिक्षण घेणे शक्य नाही, त्यांच्या साठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल. इलेक्ट्रॉनिक्सची थोडीशी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींना या पुस्तकातून मदत मिळू शकेल. जर कोणतीही शंका आली तर इमेल द्वारे त्यांचे निराकरण करता येईल. मात्र प्रत्यक्ष येऊन प्रशिक्षण घेण्याला हा १०० टक्के पर्याय नाही हे कोणीही समजून घेऊ शकेल.

अशा प्रकारचे प्रकल्प कोणालाही घरी वापरता येतात. त्यामुळे जर तुम्ही ते तयार करू शकलात तर त्याची विक्री करून तुम्हाला इतरांच्या उपयोगी देखील पडता येईल. या प्रकल्पांची तुम्हाला नीट माहिती असल्यामुळे गरज पडली तर या वस्तू तुम्ही दुरुस्त देखील करू शकता. एखादी वस्तू अनेक वर्षे वापरता येणे ही गोष्ट पर्यावरण रक्षणाला पूरक आहे हे सर्वांनाच पटेल. असे प्रकल्प स्वतः बनवून, विकून व सेवा देऊन तुम्ही " वापरा आणि फेकून द्या " या जीवनशैलीच्या विरोधात पाऊल उचलू शकता.

येथे प्रकाशित केलेल्या पुस्तकाची ही पहिली आवृत्ती आहे. ती उपयुक्त आहेच आणि त्यात किमान त्रुटी असतील अशी काळजी घेतली आहे. तरीही या पुस्तकात सतत सुधारणा होत राहतील कारण वस्तूच्या आरेखन व विकासात सतत सुधारणा होत राहतात. या सुधारणा सर्वांपर्यंत पोहोचणे महत्वाचे असते. तुम्ही या क्षेत्रात काम करत असाल तर पुस्तक वाचल्यावर त्या संबंधीच्या सूचना जरूर करा. आमच्याशी संपर्क साधण्याचा पत्ता खाली दिला आहेच. या ठिकाणी हे पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता.

हे पुस्तक ( Attribution-ShareAlike CC-BY-SA Creative Commons लायसेन्स खाली प्रकाशित केल्याने) तुम्ही छापून विकूही शकता.
मुख्यपान-HOMEPAGE

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
editormail

लेखकः विज्ञानदूत, तारीखः Sunday 14 May 2023 04:30:48 PM IST