हा पाया पक्का करण्यासाठी अधिकाधिक उदाहरणे सोडवणे हाच एक खात्रीचा उपाय आहे. वैदिक गणित, ट्रॅक्टेनबर्ग पद्धती वा तत्सम 'शॉर्ट कट' वापरण्याचा मोह बऱ्याचदा होतो. परंतु एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे जर पायाच कच्चा असेल तर अशा 'शॉर्ट कट' पद्धतीही नीट समजत नाहीत.
हा पाया पक्का करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने नियमित सराव करण्यासाठी हा प्रश्नसंच तयार केलेला आहे. इथे या प्रश्नसंचाची तपशीलवार अनुक्रमणिका दिलेली आहे. प्रत्यक्ष प्रश्नसंच मिळवण्यासाठी विज्ञानकेंद्राशी संपर्क साधावा.
हा प्रश्नसंच कसा सोडवायचा (दिवसाला-आठवड्याला-महिन्यात किती प्रश्न) हे शिक्षक-पालकांनी एकत्र ठरवणे योग्य. त्यात काही मदत लागल्यास विज्ञानकेंद्राशी संपर्क साधावा.
इथे दिलेले प्रश्न हे इंटरनेट आणि स्प्रेडशीट वापरून तयार केलेले आहेत. हे प्रश्न तयार करणे गणिताच्या शिक्षकांना जमू शकेल. त्यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा (प्रत्यक्ष/ऑफलाईन, 'ऑनलाईन' नव्हे) आयोजित करावी लागेल. सहभागी शिक्षकांकडे कंप्यूटर आणि इंटरनेट असणे गरजेचे आहे. अशी कार्यशाळा आयोजित करायची असेल तर विज्ञानकेंद्राशी संपर्क साधावा.
तुम्हाला हे निःशुल्क प्रश्नसंच पाहिजे असतील तर पुढील पत्त्यावर इमेल लिहाः